लोकमाता अहिल्यामाई

54.00

9 in stock

पुस्तकाचे नाव लोकमाता अहिल्यामाई
लेखक अशोक राणा
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ५६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ९२ ग्रॅम

Description

‘आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात. आमचेकडील फितुरास गाठले. मला दुबळी समजलात की खुळी ? दुःखात बुडालेल्यास अधिक बुडवावे हा तुमचा दृष्ट हेतू. आता आपली गाठ रणांगणात पडेल! माझ्याबरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांचीही फौज असेल. मी हरले तरी कीर्ती करून जाईन, पण आपण स्त्रियांकडून हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. म्हणून लढाईच्या भरीस न पडाल तर बरे! मी अबला असहाय स्त्री आहे, या भ्रमात राहू नये. मी जेव्हा खांद्यावर भाला घेऊन समोर उभी राहील, तर पेशव्या-ब्राह्मणांना भारी पडेल व सगळे मनसुबे जागच्या जागी विरतील.” पुढे त्या म्हणतात, “माझ्या पूर्वजांनी मिळवलेल्या स्वराज्यासाठी माझे रक्त सांडले तरी चालेल, परंतु देशद्रोही ब्राह्मण पेशव्यांचे कपट कारस्थान चालू देणार नाही. हे राज्य माझ्या पूर्वजांनी तलवारीच्या बळावर रक्ताचे पाणी करून जिंकले आहे. भाटभडवेगिरी करून नव्हे!” अशा रोखठोक शब्दांमध्ये अहिल्यामाईंनी राघोबाला त्याची जागा दाखवून दिली. पुढे त्या लिहितात, “प्रजेचे आणि राज्याचे रक्षण करणे हाच माझा धर्म आहे. राजा आणि प्रजा यांचे संबंध आई- पुत्राप्रमाणे असतात. मी अबला असे समजू नका! वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही.”

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “लोकमाता अहिल्यामाई”

Your email address will not be published. Required fields are marked *