Description
जगातल्या दाट लोकवस्तींची सर्व ठिकाणे आज शोधू गेल्यास ती हमखास समुद्रकिनाऱ्यावर आणि किनाऱ्याभोवती आढळून येतात तसेच, जगातील बहुतेक सर्व मोठी शहरे हि सुद्धा प्रामुख्याने समुद्र किनाऱ्यावर तरी असतात. किंवा किनार्याच्या आसपास तरी वसलेली आढळून येतात. इतिहासात अगदी मागे गेल्यास, म्हणजे आपल्याला आठवणार नाही इतक्या प्राचीन कालखंडापासून, मनुष्याला समुद्र परिचित आहे. पण असे असूनसुद्धा मानवाचे सागराबद्दल बरेच अज्ञान आहे. माणसाने सागरावर कितीही वेळा चढाई केली तरीसुद्धा सागर हा तसा गूढ व अज्ञात राहिला आहे. आता सागर आणि त्याचे सुप्त गुणधर्म व सामर्थ्य यांचा अभ्यास जगभर जोमाने चालू आहे. भारतातसुद्धा विद्यानांचे आणि सामान्यांचे लक्ष सागराने वेधून घेतलेले आहे. सागरविज्ञानाची ओळख या पुस्तकात आपणास करून देता देता आपल्या देशाभोवती पसरून राहिलेल्या पाण्याचे अफाट सुप्त सामर्थ्य या पुस्तकात स्पष्टपणे दाखवले आहे. त्याबरोबरच आपल्या जनतेच्या भल्यासाठी व विकासासाठी या जलसंपत्तीचा लाभ कसा उठवावा हेही यात दाखवून दिलेले आहे.
डॉ. ए. एन. पी. उमरकुट्टी यांनी एम. एस्सी. परीक्षेत सुवर्णपदक मिळवलेले असून मत्स्यविज्ञान विषयात यांनी विशेष प्राविण्य मिळवलेले आहे. आजवर त्यांनी अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केलेले आहेत. केंद्रीय सागरी मत्स्यविज्ञान संशोधन संस्था, केरळ विद्यापीठाची सागरविज्ञान प्रयोगशाळा आणि अनेक तत्सम संस्थांमध्ये त्यांनी जबाबदारीच्या पदांवरती कामे केलेली आहेत. भारतीय राष्ट्रीय सागरविज्ञान समितीवर राहून त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. केरळ सरकारच्या भाषाविषयक संस्थेमध्ये संचालकांचे पद भूषविल्यानंतर केरळमधील कालीकत विद्यापीठाचे कुलगुरू झाले.
अशोक पाध्ये हे विज्ञान लेखक असून त्यांच्या डीएनएचे गोल गोल जिने ह्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचा पुरस्कार मिळालेला आहे. विज्ञानातील अवघड मूलभूत तत्वे आणि आघाडीवरील संशोधन हे अवैज्ञानिक वाचकालाही सोप्या भाषेत समजावून सांगण्याची त्यांची हातोटी आहे. तसेच, एक उत्तम अनुवादक म्हणून ते मराठी वाचकांना परिचित आहेत.
Reviews
There are no reviews yet.