Description
आताशा ‘बुद्धतत्वज्ञान’ अनेक लोकांच्या पचनी पडत आहे. हेच ‘बुद्धतत्वज्ञान’ सम्राट अशोकाने आत्मसात केले आणि सामाजिक क्रांती घडवून आणली. सम्राट अशोकाच्या स्वप्नातील भारत प्रत्यक्षात आला तर या देशात सामाजिक क्रांती होऊन एक नवा समाज निर्माण होणार आहे. पण यासाठी सम्राट अशोकाचे कार्य घरोघरी जायला हवे. सम्राट अशोक बाबत परिवर्तनवादी व आंबेडकरवादी लेखक सुद्धा कंजुषी करत आहेत. अशोक संशोधनात्मक भरपूर लेखन होणे गरजेचे आहे. त्यांची जयंती मोठ्या प्रमाणावर संपूर्ण भारतभर साजरी व्हायला हवी. त्यासाठी सम्राट अशोकाचे कार्य, तेव्हाचे जीवनमान यांचा अभ्यास चळवळीतील व्यक्तींनी व्हायला हवा. हि कमी भरून काढण्यासाठी आचार्य दीनबंधू शेगांवकर यांच्या घराण्यातील महेंद्र शेगांवकर पुढे आलेत. आणि त्यांनी सम्राट अशोकाचे चरित्र चळवळीच्या व्यक्तींसमोर आणण्याचे ठरविले. प्रथम त्यांनी बहुजन समाजाचे मुखपत्र ‘दैनिक वृत्तरत्न सम्राट’ मधून लेखन केलं. बुद्धतत्वज्ञानावरील अभ्यासपूर्ण लेख ते लिहायला लागले. सम्राटमधून ते प्रसिद्ध व्हायला लागले. त्यांचे लेख वैचारिक व संशोधनावर आधारित असल्याने ते संग्राह्य असतात. महेंद्र शेगांवकर यांचा बुद्धतत्वज्ञानावर भरवसा आहे. बुद्धत्त्वज्ञानाच जगाला अशांततेच्या गर्तेतून वाचवू शकते ह्यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.
आचार्य दीनबंधू शेगांवकर यांचे १९५८ मध्ये ‘अशोक विजय’ हे नाटक प्रसिद्ध झाले होते. या नाट्यसंहितेवर सम्राट अशोक यांचे रेखाटन होते. हेच रेखाटन महेंद्र शेगांवकर यांनी विकसीत केले आहे. आणि हेच चित्र मुखपृष्ठावर घेण्यात आलेले आहे. आचार्य दीनबंधू शेगांवकर यांचे बाळकडू प्यालेले महेंद्र शेगांवकर एक चिकित्सक व अभ्यासक आहेत. त्यांची ‘प्रियदर्शी सम्राट अशोक’ हि पुस्तिका बहुजनवादी समाजाला निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे.
-हिम्मत कि. शेकोकार
Reviews
There are no reviews yet.