विमुक्तांचे स्वातंत्र्य

202.00

1 in stock

पुस्तकाचे नाव विमुक्तांचे स्वातंत्र्य
लेखक नारायण भोसले, प्रज्ञादया पवार, विनायक लष्कर
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २२४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २५० ग्रॅम

Description

इंग्रजी अंमलाचे भारतीय समाजावर अनेक बरे-वाईट परिणाम झाले. त्यातला सर्वात विघातक सामाजिक परिणाम म्हणजे ‘गुन्हेगार जमात’ या संकल्पनेचा उदभव. १८७१ मध्ये गुन्हेगार जमातींविषयीचा कायदा करण्यापूर्वी जवळ जवळ ४० वर्षे स्लिमन नावाचा इंग्रजी अधिकारी या जमातींचा अभ्यास करून त्यांची यादी बनवण्याच्या कामगिरीसाठी नियुक्त केला गेला. त्या यादीच्या आधाराने, १८७१ च्या काळ्या कायद्यात ह्या जातींच्या प्रजेला देखरेखीखाली किंवा चक्क कुंपणबंद कैदेत टाकण्यात आले. जिल्हाबंदी अथवा प्रांतबंदी यांसारख्या शर्ती त्यांच्यावर लादण्यात आल्या. स्वाभाविकच भटकंती करत जीवन जगणाऱ्या या जमातींचे पारंपरिक व्यवसाय व कला यांचे खच्चीकरण होत राहिले. त्यातील बऱ्याच जमातींनी स्वतःच हळू हळू आपल्या पूर्वकाळात नसलेल्या गुन्हेगारीच्या इतिहासाला आत्मसात केले. स्वातंत्र्यानंतर हि परिस्थिती बदलायला हवी होती, पण ते घडले नाही. गेल्या अर्ध- शतकात त्यांच्या अधिकारासाठी वेगवेगळ्या चळवळी होत असतानाही, त्यांच्या परी जी सहानभूती निर्माण व्हायला पाहिजे होती, ती झालेली नाही. जर्मनीमध्ये ज्यू आणि अमेरिकेत कृष्णवर्णीय ह्यांच्या झालेल्या हालअपेष्टा व संघर्ष जगभर माहित आहेत. भटक्या विमुक्तांची कहाणी मात्र फारच थोड्या प्रमाणात ज्ञात आहे. ‘परिवर्तनाचा वाटसरू’ ने ज्या तळमळीने विशेषांक काढून, त्यांचे पुस्तक प्रकाशित करण्याचे ठरविले, ते वाटसरूच्या आजपर्यंतच्या उपक्रमाला धरूनच असले तरी त्यातही विशेष धन्यवादास पात्र आहे. हे पुस्तक अनुभवाच्या मुशीत घडलेले, विचारपूर्वक लिहिले गेलेले असे उत्कृष्ट पुस्तक आहे. त्याच्या प्रकाशात भटक्या विमुक्तांच्या जीवनात काही नवा बदल घडण्याचे रस्ते उजळले तर ह्या प्रयत्नाचे सार्थक होईल. ते होवो.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विमुक्तांचे स्वातंत्र्य”

Your email address will not be published. Required fields are marked *