Description
(मुंबई इलाखा महार परिषद ही ऐतिहासिक परिषद मुंबई येथे दि. ३०,३१ मे व १ व २ जून १९३६ अशी चार दिवस पार पडली.
मुंबई इलाखा महार परिषदेच्या मंडपातच मुंबई इलाखा मातंग परिषद, अखिल मुंबई इलाखा संत समाज परिषद आदीही पार पडल्या. जवळजवळ पन्नास हजारांहून जास्त लोक परिषदेला हजर होते.
‘मुंबई इलाखा महार परिषद’ गाजली ती ‘मुक्ती कोण पथे ?’ या बाबासाहेबांच्या भाषणामुळे. बाबासाहेबांचे मराठीतून केलेले हे भाषण मराठी साहित्याचा अनर्घ्य अलंकार तर आहेच, परंतु त्यातील वैचारिक प्रतिपादनामुळे बाबासाहेबांची धर्मांतराच्या प्रश्नाकडे पाहण्याची दृष्टी या भाषणात स्पष्ट होते. अस्पृश्यांच्या मुक्तिलढ्यात या भाषणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
बाबासाहेबांच्या या भाषणाची पुस्तिकाही १९३६ साली काढण्यात आली होती. ‘जनता’ (२७ जून १९३६) पत्रावरून मूळ भाषण आहे त्या स्वरूपात येथे देत आहोत.)
Reviews
There are no reviews yet.