Description
संत कबीर !
महाराष्ट्रातील भागवत धर्माची पताका उत्तरेकडे अगदी पंजाबपर्यंत नेऊन पोचविणाऱ्या संत नामदेवांचे उत्तराधिकारी.
आपल्याला अत्यंत आदरणीय वाटणाऱ्या पाच संतांमध्ये संत तुकारामांनी त्यांचा समावेश केला.
त्यांचा ‘ बीजक ‘ ग्रंथ मी. फुले यांच्या नित्यवाचनात होता. त्यातूनच त्यांची सामाजिक जाणीव घडली.
आपली आई कबीरपंथी असल्यामुळे आपल्यावर कबीरांचा प्रभाव आहे, असे मी. गांधींनी म्हटले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला गुरुस्थानी असणाऱ्या तीन व्यक्तींमध्ये त्यांचा अमावेश केला.
कोण हे कबीर ? हिंदू ? मुस्लिम ? निर्गुण उपासक ? समाजसुधारक ? असं काय आहे त्यांच्या व्यक्तिमत्वात कि भारतातच नव्हे, तर देशोदेशी त्यांच्याविषयीची जिज्ञासा आणि आकर्षण वाढतच चाललं आहे…..
यांसारख्या अनेक प्रश्नांच्या उत्तरांच्या प्रामाणिक शोध म्हणजे हे पुस्तक !
Reviews
There are no reviews yet.