Description
पहिल्या आवृत्तीच्या वेळी तत्वज्ञान मार्क्सवाद- फुले – आंबेडकरवाद होते. पण, अन्वेषणपद्धत विधायक अब्राम्हणी वा बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादी होती आणि प्रमाणशास्र उत्स्फूर्त जाणीवनेणीवेचे होते. मात्र मार्क्सवाद व दिग्नागवाद यांच्या संयोगातून होणारे सौत्रांतिक मार्क्सवादाचे नवे तत्वज्ञान यायचे होते. त्यामुळे विधायक अब्राम्हणी अन्वेषणपद्धत नकारात्मकतेतून पूर्णपणे मुक्त झाली नव्हती. हि तिसरी आवृत्ती सौत्रांतिक मार्क्सवादावर उभी असली, तरी इतिहासिकतेखातर अपरिहार्य असलेले माफुआचे उल्लेख बदललेले नाहीत.
नामांतराचा लढा दोन सत्याग्रहांपर्यंत नामांतर कृती समितीने लढवला. ज्यावेळी तो यशस्वी होणार होता तेव्हा लढा तीव्र करण्याऐवजी सोडून दिल्यामुळे श्रेय कॉग्रेसला मिळाले. ‘रिडल्स’ च्या प्रश्नांवर संयुक्त आघाडी न झाल्याने दलित पक्षसंघटनांनी केवळ दलितनिदर्शनांवर भर दिला आणि ब्राम्हणी छावणीने सुरु केलेल्या वाग्युद्धाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रबोधनाभावात ओबीसींना दलितविरोधी करण्यात ब्राम्हणी छावणी यशस्वी झाली. हे लक्षात यावे म्हणून ‘संघर्ष’ रामकृष्णभक्तीचा वा आंबेडकरभक्तीचा ‘ हे माझे फेब्रुवारी ८८ च्या ‘सत्यशोधक मार्क्सवादी ‘ मधील संपादकीय या आवृत्तीत मुद्दाम शेवटी टाकले आहे.
प्रबोधनाशिवाय समाजक्रांती यशस्वी होत नसते असे डॉ. आंबेडकर १९३६ साली ‘ अनिहिलेशन ऑफ कास्ट ‘ मध्ये म्हणाले होते. पण जात्यन्त त्यांनी प्रथम घटनेवर व नंतर नवबौध्द धम्मावर सोपवल्यामुळे समाजक्रांतीचे उद्दिष्टच इतिहासदत्त असल्याचे आकळल्याशिवाय प्रबोधनाची अपरिहार्यता स्वीकारली जात नाही.
जात्यन्तक भांडवलदारी लोकशाही क्रांतीची यशस्विता समाजवाद- उभारणीच्या पूर्वतयारीवर अवलंबून आहे. त्यामुळे प्रबोधनाचा परीघ स्त्रीराज्यापर्यंत जातो. ब्राम्हणी प्रवाहाने स्त्रीराज्यापासून अब्राम्हणी प्रवाह नष्टप्राय व बदनाम केल्यामुळे त्यातून त्याला मुक्त केल्याशिवाय प्रबोधन काय समाजवाद उभारणीही होऊ शकणार नाही. माझ्या व्याख्यानांचे व त्यांना लेखाबद्ध करणाऱ्या या पुस्तकाचे प्रयोजन ते आहे.
Reviews
There are no reviews yet.