Description
” युरोपातील भांडवलदारी लोकशाही क्रांत्यांची पूर्वतयारी प्रबोधनाने (enlightenment) केली होती. पण, १९१७ पासून झालेल्या समाजवादी क्रांत्यांची पूर्वतयारी करणारे प्रबोधन अजूनही झालेले नाही. युरोपीय समाजवादपतनाचे मुख्य कारण हे आहे. भारतीय जातिव्यवस्थाअंतक लोकशाही क्रांतीचे प्रबोधन होऊ शकलेले नाही. हि डॉ. आंबेडकरांची खंत होतो. प्रबोधनाच्या सांस्कृतिक परिवर्तनात सौदर्यशास्राची भूमिका मोक्याची असते. परंतु, समाजवादी बाह्यार्थवाद (socialist realism ) हे समाजवादाचे सौदर्यशास्र कालबाह्य होऊन गेल्याने पाश्चिमात्य व पौर्वात्य जगात चैतन्यवादी सौदर्यशास्राचीच सद्दी चालू आहे. हि सौन्दर्यशास्रे सार्वत्रिकतेला दावा करीत असली तरी ती प्रस्थापितांतीच आहेत. इसवीच्या ४ थ्या शतकापासून वर्णजात स्त्रीदास्यविरोधी सर्वांगीण संघर्ष करीत असता दिग्नाग स्कूलच्या सौत्रान्तिक विज्ञानवादाने तंत्राशी संयोग करून ज्या सौदर्यशास्राची ब्राम्हणी साहित्यशास्राविरुद्ध उभारणी केली त्याचे विवरण या पुस्तकात भारतीय सामाजिक व दार्शनिक संघर्षाच्या अनन्यतेचा मागोवा घेत केले आहे. सौदर्यशास्राचा उदय युरोपात १८ व्या शतकात झाल्याने या पुस्तकाने घेतलेला हा मागोवा व विवरण पथप्रदर्शक ठरावे. ”
Reviews
There are no reviews yet.