Description
” युगप्रवर्तक कृती ! ” – डॉ. धर्मेन्द्रनाथ शास्त्री .
”..सोशल सायन्टिस्टमध्ये मी तुमचे लेख (चार प्रकरणे ) साहजिकच वाचलेली आहेत. माझी खात्री आहे कि तुमची कृती, प्रसिद्ध होईल तेव्हा, प्राचीन भारताच्या आकलनाला वैशिष्ट्यपूर्ण योगदान ठरेल…”
डॉ. इर्फान हबीब
”.. मला वाटते कि भारतीय इतिहास व समाज याबाबतच्या मार्क्सवादी चचिकित्सेला तुमचे योगदान एवं विशिष्ट् आहे. तुमच्या श्रेणीच्या विचारवंतांची कल्पना करता माझ्यापुढे केवळ दा. ध. कोसंबींचे नाव येते; पण तुमच्याशी तुलना करता, त्यांची चिकित्सा जरी जास्त शिस्तबद्ध असले तरी ढोबळ व विरळ आहे…”
प्रा. मे. पु. रेगे
”.. प्रबंधाचा केलेला विकास तपशिलात सापेक्षतः नवा आहे. किमानपंथी हा प्रबंध प्राचीन भारतीय कालखंडावर नव्या त्रिमितीचा आग्रह धरतो. संबंध विवेचनही सहमत होणे शक्य, नसले तरी अनेक प्रतिपादने नव्या चिकित्सांची संभाव्यता व अंतर्दर्शने देतात यात संशय नाही…”
डॉ. रोमिला थापर
”..हिंदू परंपरा व समाजरचना यांच्या चिकित्सक अभ्यासाकडे भारतीय मार्क्सवाद्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे मार्क्सवाद हिंदू समाजात पकड घेऊ शकला नाही. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला ६० वर्षे होऊन गेली असली, तरी आजही तिचं मार्क्सवादी डोळ्यांपुढे येतात प्रा. दा. ध कोसंबी, प्रा. देबीप्रसाद चटोपाध्याय व श्री. शरद पाटील…”
डॉ. अ. भि. शहा
१९७२ साली लिहिल्या गेलेल्या या ग्रंथाची अन्वेषणपद्धत मार्क्सवादी फुले-आंबेडकरवादी (अब्राम्हणी ) असली, तरी नवी बहुप्रभावी अन्वेषण पद्धत, नवे सौदर्यशास्त्र व नवे सौत्रांतिक मार्क्सवादी तत्वज्ञान या दिशेने त्याने डिपार्चर घेतले आहे.
Reviews
There are no reviews yet.